*💫बांदा दि.२३-:* शेळ्या चरावयास घेऊन जात असताना वाटेत अडवून दोघा बहिणींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दीपक नाईक (२०) व अनिल विष्णू राऊळ (३७, दोघेही रा. इन्सुली गावठणवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांही संशयितांना बांदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बांदा पोलीसांकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, इन्सुलीतील दोन युवती शेळ्या घेऊन नदीकाठाने जात होत्या. त्यावेळी सचिन नाईक व अनिल राऊळ यांनी समोरुन येत शेळ्यांना अडविले व युवतींची चेष्टामस्करी करु लागले. अश्लील हातवारे करुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करु लागले. अखेर युवतींनी आरडाओरड केल्यानंतर दोघेही पळून गेले असे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीवरुन दोघांनाही बांदा पोलीसांनी ताब्यात घेत भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
इन्सुली-गावठणवाडीतील दोघा तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल…
