तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना विश्वासात
सावंतवाडी
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उद्याच्या निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी गांधीचौक येथे होणारी सभा ही न भुतो न भविष्यती अशी ऐतिहासिक सभा होईल त्याचा दौरा शिवसैनिकांसाठी ऊर्जा देणारा ठरेल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
तर सकाळी बारा वाजता शहरातील चिटणीस नाका परिसरात सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले जाईल त्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचेही श्री राऊळ यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना नेते आदित ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने उद्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात येत आहेत यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सावंतवाडी गांधी चौक येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही सभा होत असल्याने आणि शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर शिवसेनेवर शिवसेनेच्या नेत्यावर करत असलेल्या टीकेला आदित्य ठाकरे नेमके काय उत्तर देणार यासाठी या सभेकडे संपूर्ण जिल्हावाशीयांचे लक्ष लागून आहेत. ही सभा नेमकी कसे असेल कशाप्रकारे ठाकरे यांचे सावंतवाडीत स्वागत केले जाईल या संदर्भात शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख श्री राऊळ यांनी पत्रकारांचे संवाद साधला यावेळी त्यांनी वरील विधान केले. त्यांच्यासोबत युवा सेनेचे योगेश नाईक, गुणाजी गावडे, अब्जू उर्फ विनायक सावंत, आदी उपस्थित होते.
