आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये चोरी…

*💫बांदा दि.२३-:* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील संगणक कक्षेच्या खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत कक्षातील संगणकाच्या दहा ब्याटऱ्या लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले असून सातार्डा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे नववी व दहावी वर्ग सुरू आहेत. पंचनामा व जबाब घेण्याचे काम सुरू आहे.

You cannot copy content of this page