वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्यास सुरुवात

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या प्रयत्नांना यश

⚡वैभववाडी ता.२९-: वीज वितरण कंपनीकडून कोकिसरे येथील वीज वाहिण्या व खांबावर आलेली झाडी तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी युवक काॕग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

वैभववाडी तालुक्यातील वीज प्रश्नांसंदर्भात जाधव यांनी वीज वितरणला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांनी तालुक्यातील वीज समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार कोकिसरे गावातील वीज वाहीण्यांवरील झाडी तोडण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीला गावातीलच कामगार ग्रामस्थांनी दिले असून जोरदार वीज तोडणी सुरु करण्यात आली आहे. यावेळी जाधव यांच्यासह दिलीप नारकर, आनंद पवार, संतोष पालकर, बाळा वळंजू, दशरथ पालकर, रवी कानेटकर, अनिल पाटेकर, सदानंद वाडेकर, परशुराम चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page