त्रिंबक येथे ब्राह्मण ज्ञाती बांधव स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

*💫मालवण दि.२३-:* मालवण तालुक्यातील ब्राह्मण ज्ञाती बांधवांचा स्नेहमेळावा त्रिंबक येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण तालुका ब्राम्हण मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत सरजोशी तर प्रमुख अतिथी म्हणुन वेदमुर्ती सचिन भाटवडेकर, भालचंद्र वझे उपस्थित होते. गणेश पुजन व गो पुजनाने संमेलनाचा शुभारंभ झाला. यावेळी तालुक्यातील गूणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. वेदमुर्ती सचिन भाटीवडेकर यांनी श्री रामरक्षा स्तोत्राची रचना, वैशिष्ठे, अर्थ व फलश्रुती या विषयावर मौलिक व प्रेरक मार्गदर्शन केले. भा.ल. वझे यानी ज्ञाती बांधवांची सद्यस्थिती बाबत मार्गदर्शनात उहापोह केला. दुपारच्या सत्रात बाल गायकांचा गुणदर्शन कायक्रम झाला. यावेळी बालगायकानी नाट्यगीत, भक्तीगीत, तसेच बासरी वादन सादर केलं. वेदमुर्ती सचिन भाटवडेकर, वझे गुरुजी यांचा आचरे ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संमेलनासाठी सुमारे १५० ज्ञाती बांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन उदय मेहेंदळे यांनी केले तर आभार यशवंत सरजोशी यांनी मानले.

You cannot copy content of this page