सिंधुदुर्ग काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा…
*💫सावंतवाडी दि..२३-:* महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण समारंभ प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांच्या प्रमुख उपस्थितित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी रूपाली सावंत उपस्थित होत्या. यावेळी सुश्मिता देव यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
