💫वैभववाडी दि.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कुसुर गावचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक चळवळीतील जेष्ठ विचारवंत नेते तथा बौध्दजन पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. प्रा.रमाकांत यादव यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रा. रमाकांत यादव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनिर्मित सिध्दार्थ कॉलेजचे प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कणकवली परिषद अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष होते. तसेच सिंपन प्रतिष्ठान मुंबई तसेच वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे मार्गदर्शक होते.
त्यांच्या अचानक जाण्याने फार मोठा धक्काच बसला. सामाजिक शैक्षणिक चळवळीतील आधारवड हरपला. त्यांच्या जाण्याने विशेषतः आंबेडकर चळवळीचे अतोनात नुकसान झाले. अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी व्यक्त केली दी बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा महाराष्ट्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण सरांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले..