सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी-मळगाव च्यावतीने भरविण्यात आले प्रदर्शन
अमित वेंगुर्लेकर यांच्या हस्ते होणार आयोजकांचे सत्कार
💫सावंतवाडी दि.१८सहदेव राऊळ- : दिवाळी निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी-मळगावच्यावतीने मळगाव-रस्तावाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी भरविण्यात आले आहे. उद्या १९ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनास ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेशसह सचिव अमित वेंगुर्लेकर भेट देणार असून त्यांच्या हस्ते आयोजकांचे व स्पर्धकांचे जाहीर सत्कार करण्यात येणार आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी मळगावच्यावतीने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा उद्या १९ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. मळगाव येथे भरविलेले हे प्रदर्शन महाराष्ट्र वासियांना फार अभिमानाची बाब असून या उपक्रमाचा बोध घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरातन कालीन किल्ले, गड जोपासायचे या संदर्भात बोध व प्रेरणा नव्या पिढीला मिळावी याकरिता अमित वेंगुर्लेकर या प्रदर्शनाला भेट देणार असून आयोजकांचे व स्पर्धकांचे जाहीर सत्कार करणार आहेत.