शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत प्रवेश
💫सावंतवाडी दि.१८-: साटेली गाव विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा कुबल यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, साटेली सरपंच केशव जाधव, सुधा कवठणकर, उदय पारीपत्ते, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र कोरगावकर, सुभद्रा कुबल, संतोष सावंत, राजन नाईक नंदू झारापकर, नम्रता झारापकर, रेश्मा नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मुळीक यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पक्ष वाढीचे जोमाने काम करण्याचे सांगितले.
तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रवेशकर्त्या कुबल यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच रघुनाथ नाईक यांना शुभेच्छा देत ग्रामपंचायतीने गावासाठी भरीव विकासकामांचा योगदान द्याव तसेच ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी संघटनेच्यावतीने मदत करण्याचे आश्वासन दिले