महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीतर्फे.सूर्यकांत आडेलकर यांचे अभिनंदन
💫सावंतवाडी दि.१९-: बुधवारी सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी मोती तलावाच्या काटावरुन ७५ वर्षीय वृद्ध महीला तोल जाऊन तलावात पडली. त्या क्षणी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे सुरक्षारक्षक सूर्यकांत आडेलकर हे तेथून जात होते. त्यांचा लक्ष पडताच क्षणी त्यांनी तलावात उडी मारत त्या महीलेचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सुरक्षा रक्षकांची मान उंचावली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीतर्फे सुरक्षा रक्षक सूर्यकांत आडेलकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
गेले दहा महीने आरोग्य विभागातील सुरक्षा रक्षकांचे शासन मान्यते अभावी पगार झालेले नाहीत. तरीही सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्याशी मात्र एक निष्ठ आहेत, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सुरक्षा रक्षक आडेलकर यांनी जे प्रसंगावधान दाखविले त्याची दखल शासन व लोकप्रतिनिधीने दखल घेणे गरजेचे आहे.