जिल्हा बँकेचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
बँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या प्राथमिक विविध सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे अभिनंदन करण्यासाठी २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे सभा आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, अनिरुद्ध देसाई, बाबा परब, व्हिक्टर डान्टस, मेघनाद धुरी उपस्थित राहणार आहेत.
