१३ ऑगस्टला ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर

मालवण दि प्रतिनिधी

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर टस्टतर्फे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड आणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ यावेळेत येथील ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरामधे कर्करोगाचे तज्ज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तसेच नवीन संशयित स्तनाच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी करून केमोथेरपी / रेडिओथेरपी इत्यादी उपचार व शस्त्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन करणार आहेत. खश्ए कॅन्सर टीम अंतर्गत पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ज्ञ सर्जन प्रा. डॉ. सुरेश भोसले (KIMS कराड) रुग्णांना सल्ला मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या प्री-स्क्रिनिंगसाठी डॉ. शमिता. बिरमोळे (कणकवली) या २७ रोजी सकाळी ८.४५ वाजता येथील रेडकर हॉस्पिटल येथे येणार आहेत. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी डॉ. गार्गी ओरसकर (९४२०९७००२३), डॉ. रामचंद्र चव्हाण, रेडकर हॉस्पिटल, मालवण यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page