नगर वाचन मंदिर व नारींग्रेकर कुटुंबीय ट्रस्टचा उपक्रम ;३१ जुलै रोजी कार्यक्रम
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील नगर वाचन मंदिर आणि नारिग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात यावर्षीपासून दहावी परीक्षेमध्ये सेमी. इंग्लिश माध्यमातून संपूर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरुपात देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
यावर्षी संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन या विषयात तन्वी गणपत चौकेकर (९९.२०), मानसी नीलेश करलकर (९३.४०), राघव सतीश वझे (९१.५०) व श्रावणी हेमंत पेडणेकर (९०.६०) यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली आहे. पालक, शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.
