पाडलोस येथे १५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १५ ऑगस्ट रोजी गाव व्हाट्सअँप ग्रुप,आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय ३००१ व सन्मानचिन्ह, तृतीय २००१ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

तसेच उत्कृष्ट गायक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट तबलावादक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट हार्मोनियम ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट झांजवादक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट पखवाजवादक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट कोरस ५०१ सन्मानचिन्ह देण्यात येईल, अशी वैयक्तिक पारितोषिकेही आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुक भजन मंडळांनी आपली नावे ५ऑगस्ट पर्यंत विश्राम गावडे ९०६७२२०५०५यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page