बालक अत्याचार विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला विधी सेवा समिती व बार असोसिएशन यांचे होते आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- मे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे निर्देशान्वये वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे बालक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा २०१२ यावर जनजागृतीपर शिबिर संपन्न झाले.

  या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील व अॅड.एस.पी.बाविस्कर यांनी बालक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा २०१२मधील विविध तरतुदीचे विस्तृत स्वरुपात मार्गदर्शन केले. वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे यनी सूत्रसंचालन व आभार मानले.  या शिबिरास १७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
You cannot copy content of this page