सावंतवाडी शिवसेनेचा उपक्रम
सावंतवाडी,ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम येथील संचयनी पॅलेस मधील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शैलेश परब, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बाळा गावडे,गुणाजी गावडे, शब्बीर मणियार,सागर नानोस्कर, प्रशांत कोठावळे, तात्या वेंगुर्लेकर, आबा सावंत रश्मी माळीदेव आदी.उपस्थित होते.
