हिंदुत्ववादी पक्ष संपविण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली

आम. वैभव नाईक; शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक

⚡कणकवली ता.२६-: शिवसेना हाच हिंदुत्वावादी पक्ष आहे. भाजपच्या हुकूमशाही पद्धतीला शिवसेना पक्षच प्रखर विरोध करत आला आहे.महागाई विरोधात आवाज उठवत आहे. त्यामुळेच शिवसेना पक्ष संपवुन हिंदूंची मते भाजपच्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली. मात्र शिवसेनेला संघर्षाचा वारसा आहे. संघर्षात शिवसेना अधिक पेटून उठते. त्यामुळे येत्या निवणुकीत सर्व ताकदीनिशी उतरून नगरपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. गेलेले लोक स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत आहेत. परंतु राज्यातील जनता उद्धवठाकरे यांच्या पाठीशी आहे. संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत जनता कायम राहते. पक्ष आणि आपला नेता अडचणीत असताना आपण त्यांच्या पाठीशी राहणे हे आपले देखील कर्तव्य आहे. असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले.

    शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विजयभवन येथे पार पडली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत शिवसेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम राहण्याचा  ठराव घेतला. 
     
यावेळी सतीश सावंत म्हणाले, शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. आणि त्यांनीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे यांची निवड केली. त्यामुळे शिवसेनेवर कोणीही हक्क दाखवत असेल तरी  उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे असतील तीच खरी शिवसेना  कायम राहणार आहे. शिवसेनेचा ठाकरे नावाचा ब्रँड कोणीही संपवू शकत नाही.नारायण राणेंचा पराभव करून दोन वेळा निवडून आलेल्या  आ. वैभव नाईक यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. याचा शिवसैनिकांना अभिमान आहे असे सांगितले. 

   संजय पडते म्हणाले, बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत सर्वसामान्य लोकांना आमदार, खासदार,मंत्री मुख्यमंत्री अशी मोठं मोठी पदे प्राप्त झाली. पूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बूथवर पक्षाचे टेबल लागत नव्हते. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढली आहे. आता पक्ष संकटात असताना आपण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहणे गरजेचे आहे. उद्धवजींच्या आदेशानुसार जास्तीत जास्त सभासद नोंदणी व प्रतिज्ञा पत्रे द्यायची आहेत.आम. वैभव नाईक हे शिवसेना आणि शिवसैनिकांशी प्रामाणिक राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. गद्दारी  केलेल्या दीपक केसरकरांना पराभूत करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली आहे. असे  त्यांनी सांगितले.
       यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, उपतालुका प्रमुख राजू राणे, बाबू रावराणे,संदेश पटेल, आबू पटेल, संजय आंग्रे,रुपेश आमडोसकर,कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, राजू रावराणे,बंडू ठाकूर,निसार शेख, तात्या पवार, मधुकर वळंजू, आनंद आचरेकर, अनुप वारंग ,अरविंद राणे, गोट्या कोळसुलकर, उत्तम लोके,  प्रदीप सावंत,चंदू परब,सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, रवींद्र गावडे, विलास गुडेकर,प्रतीक्षा साटम,साक्षी आमडोस्कर, मानसी मुंज,वैदेही गुडेकर,धनश्री मेस्त्री,माधवी दळवी, संजना कोलते, संतोष गुरव,उमेश गुरव, नंदू परब,आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You cannot copy content of this page