राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीची वागदे धडक कारवाई
⚡कणकवली ता.२६-:
गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या विक्रीसाठी अहमदनगरकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेने वागदे येथे कारवाई करून तीन जणांना अटक केली.या कारवाईत दोन वाहनांसह दारूचे १०० बॉक्स जप्त करण्यात आले . एकूण २३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षककणकवली यांना खात्रीशीर माहिती मिळाल्या मुळे दोन पंच आणि स्टाफसह वागदे येथे गाड्यांची तपासणी केली. पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता . सदर वाहनामध्ये गोवा राज्यात विक्रीस असलेले एकूण १०० बॉक्स जप्त करण्यात आले . सदर मिळून आलेले . १०,२९ ,६०० पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप व पायलटिंगसाठी वापरण्यात येणारी हुंडाई कंपनीची वेर्णा कार असा एकूण रु . २३ लाख ८१६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
सदर वाहनचालक रविन्द्र दत्तू कापसे (वय २७ वर्ष , रा . मु.पो. हाळगांव , ता . जामखेड , जिल्हा अहमदनगर),देवीदास अंबादास डोके , (वय ३२ वर्ष , रा .भूतवडा , ता .जामखेड , जिल्हा अहमदनगर) व अजित लालासाहेब उबाळे (वय ३२ वर्षे , रा . बोडी , ता . जामखेड , जिल्हा अहमदनगर) यांना या कारवाई दरम्यान ताव्यात घेण्यात आले आहे .
सदरील कारवाई अधीक्षक डॉ. वी. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मागदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत, यांनी केली . सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक एस.डी. पाटील , जे.एस.मानेमोड , सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस. चौधरी, महिला जवान श्रीम . एस . एम . कुबेसकर , वाहनचालक जगन चव्हाण , श्री.खान व श्री . शहा यांनी मदत केली.पुढील तपास निरीक्षक प्रभात सावंत करीत आहेत .
