जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी प्रा दिलीप शितोळे

कार्याध्यक्ष प्रा संजय गांवकर

वेंगुर्ले

    सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षपदी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे प्रा. दिलीप शितोळे यांची, कार्याध्यक्षपदी श्री दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर चे प्रा.संजय गावकर यांची व सचिवपदी आरपीडी ज्युनियर कॉलेज सावंतवाडी चे प्रा.पवन वनवे यांची निवड करण्यात आली.

     सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारिणीची सभा दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर येथे संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अरुण चव्हाण – कणकवली कॉलेज, प्रकाश किल्लेदार – जुनिअर कॉलेज कुडासे, नामदेव मासी – ज्युनियर कॉलेज कट्टा, खजिनदारपदी – विनोद चिंदरकर – कनिष्ठ महाविद्यालय देवगड, सहसचिव काशिनाथ बागेवाडी – जुनिअर कॉलेज साळगाव, समन्वयक  कांतीलाल जाधवर – कणकवली कॉलेज व  सल्लागार गंगाधर काळे –  जुनिअर कॉलेज बांदा यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेला वरील पदाधिकारी तसेच कार्यकारिणीचे सदस्य डॉ. श्रीराम दीक्षित- शिरोडा, नारायण साळवी – कुडाळ, रामचंद्र राऊळ – कासार्डे, अनिल मांगले – दोडामार्ग,  अमोल कांबळे – सावंतवाडी, अजय गुरसाळे – खारेपाटण आदी उपस्थित होते.

      सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील सभासदांच्या २०२०-२१ या वर्षातील पी एफ स्लीप, ३ वर्षापासून प्रलंबित थकित वेतन प्रस्ताव, २ वर्षाच्या डीसीपीएस स्लीप, जुनी पेन्शन योजना तसेच विनाअनुदानित घोषित कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान आदी व अन्य विषयावर चर्चा झाली व शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सभासद वाढविण्यासाठी जिल्हाभर कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन अभियान राबवायचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
श्री. काळे यांनी आभार मानले.

फोटो

You cannot copy content of this page