भंडारी समाजाची सभा संपन्न

आरक्षण मिळाल्याने केले अभिनंदन

वेंगुर्ले

     भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले या मंडळाची सभा  स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स वेंगुर्ले येथे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा ओबीसी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा करण्यात आली.

      यावेळी उपाध्यक्ष श्याम गोडकर, चंद्रकांत गडेकर, सचिव विकास वैद्य तसेच सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, दिनेश तांडेल, डॉ. आनंद बांदेकर, दत्ताराम नार्वेकर, चिंतामणी धुरी, ऍड. प्रकाश बोवलेकर, श्री. पेडणेकर, सारिका कळसेकर, सौ. साळगावकर आदी कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी मागील इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. तसेच जमा खर्च वाचन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचा क्रिकेट संघ तयार करण्यासाठी तालुका पातळीवर क्रिकेट संघ निवडण्याचे ठरले. वेंगुर्ले तालुका भंडारी समाजाचे दोन संघ तयार करण्यासाठी कार्यकारिणी समिती सर्वानुमते निवडण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील सर्व भंडारी समाजाच्या वीस वर्षावरील क्रिकेट खेळाडूंनी समिती सदस्य दत्ताराम विठ्ठल नार्वेकर (९४२२५७६८४५), चिंतामणी भिकाजी धुरी (९४२२५७६८५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.

फोटो : भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले च्या सभेत बोलताना अध्यक्ष रमण वायंगणकर,सोबत विकास वैद्य व अन्य सदस्य, पदाधिकारी

You cannot copy content of this page