तरच नवी पिढी व्यसनाधीन नसणार-: डॉ संजीव लिंगवत

वेंगुर्ले ता.२६-: महिला बचत गटाच्या माध्यमातून गावागावांत व्यसन मुक्ती अभियान राबविल्यास व महिलांनी निर्भयपणे गावातील बेकायदेशीर दारू अड्ड्याना विरोध केल्यास व्यसनाला आळा बसेल. महिलांनी गावा सोबत आपल्या घरातील पाहुणेचारात कार्यक्रमाना विडी,तंबाखू, पान न ठेवल्यास, आपल्या मुलांकडे योग्य लक्ष दिल्यास नवीन पीडी व्यसनाधीन होणार नाही अशे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान अंतर्गत उभादांड,अणसुर, मोचेयाड, आसोली ,परबवाडा बचतगट, वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले नगरपरिषद, पंचायत समिती, अंमली पदार्थ विरोधी समिती, जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात अंमली पदार्थ विरोधी समिती व नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी झेप बचतगट कार्यालय,उभादांडा यांच्या सभागृहात केले.

यावेळी अंमली पदार्थ विरोधी समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, रूपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर
उपाध्यक्ष जयराम वायंगणकर, सचिव सत्यवान साटेलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रभाग समन्वयक सागर आवळेगावकर यांनी, आभार प्रदर्शन पुजा भाईडकर तर सुत्रसंचालन मानसी आंगचेकर यांनी केले.
कार्यक्रमात बहुसंख्य बचतगट पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page