*पंचायत समितीच्या मासिक सभेत मागणी : सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न
*💫सावंतवाडी दि.२२-:* तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पाणी टंचाई संदर्भात तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींना तीन ते चार वेळा अहवाल सादर करण्याबाबत कळवूनही फक्त बारा ग्रामपंचायतीने उत्तर दिले असून यातील तीनच ग्रामपंचायतीने पाणीटंचाई नसल्याचे कळविले. मात्र उर्वरित ग्रामपंचायतींना पाणीटंचाईचे गांभीर्य नसून उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याला सरपंच ग्रामसेवक यातील एकाला जबाबदार धरावे तसेच या ग्रामपंचायतींना २९ पर्यंत अहवाल सादर करावा आणि दिलेल्या कालावधीत अहवाल का सादर केला नाही याचाही खुलासा करावा अशी मागणी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या पंचायत समिती कार्यालयात आज पार पडली. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, गटविकास अधिकारी व्ही एम. नाईक, सदस्य रवी माडगावकर, श्रीकृष्ण सावंत, शर्वानी गावकर, गौरी पावसकर, मेघशाम काजरेकर, संदीप नेमळेकर, रेश्मा सावंत व इतर उपस्थित होते. यावेळी पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात ग्रामपंचायतींना लेखी ळविण्याचे आवाहन करण्यात आले होते यातील केसरी सांगली सातोसे, इन्सुली दांडेली कलंबिस्त सोनुर्ली या गावांनी वस्ती वाड्या मध्ये पाणी टंचाई आहे, असे कळविले आहे. तीन ग्रामपंचायतनी पाणीटंचाई नसल्याचे कळविले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीने कोणतेही माहिती दिली नाही. ग्रामसेवक सरपंच यांनीही बेजबाबदारपणा दाखविला असल्याचे यावेळी संदीप नेमळेकर यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसात अशा उर्वरित गावांमध्ये पाणी टंचाई भासल्यास त्याला ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असतील असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी काही सदस्यांनी पुन्हा एकदा अहवाल कळविण्यात बाबत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली त्यावर नाईक यांनी 29 पर्यंत मुदतवाढ देण्याच्या सुचविले मात्र नेमळेकर यांनी 29 तारखेपर्यंत पाणीटंचाई ची माहिती देताना यापूर्वी दिलेल्या मुदतीत माहिती का दिली नाही याचाही लेखी खुलासा ही करावा अशी मागणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाकडून जरा जीवन मिशन अंतर्गत 60 टक्के नळजोडणी झाली असल्याचे सांगून उर्वरित कामासाठी सध्या मनुष्यबळ कमी आहे याची माहिती दिली यावेळी श्रीकृष्ण सावंत यांनी नगरपालिकेचे पाणी माजगाव चराठे यां गावातील वस्ती ना देण्यात येते मात्र पालिकेला पाणी पुरत नसल्याने भविष्य माजगाव आणि चराटे या गावांचे काय प्रश्न उपस्थित केला यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कुणकेरी व कोलगाव याठिकाणी पाळणेकोंड घरण नसल्यामुळे त्या गावांना पाणी देण्यात येते. मात्र माजगाव मळगाव आणि चराठे साठी स्वतंत्र योजना करण्यात आलेली आहे. साडेचार कोटींची योजना झालेली आहे. यावर सावंत यांनी साडेचार कोटीं चा योजनेचा प्रकल्प जीवन प्राधिकरणाच्या भ्रष्ट कारभारामुळे पाण्यात गेला आहे. एकीकडे हर घर जल असे सांगायचे आणि दुसरीकडे जल मध्ये भ्रष्टाचार करायचा मग घरापर्यंत जल कसे पोहोचणार कसे असा सवाल उपस्थित केला. तसेच या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची या प्रकल्पाची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी या सभेत केली.
