*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला सेवाभावी संस्थेतर्फे १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन भेट

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते प्रत्येक पोलीस ठाण्याला करण्यात आले वाटप*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला एका सेवाभावी संस्थेने १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन (पाण्याचे यंत्र) भेट दिले असून या मशीनचे वाटप आज जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला वाटप करण्यात आले. या मशीन मधून पोलिसांना आता थंड, कोमट व गरम पाणी उपलब्ध होणार आहे. कोरोना कालावधीत जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस कल्याण निधीचा भाग म्हणून वस्तू स्वरूपात देणगी देण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले होते. पोलीस अधीक्षकांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एका सेवाभावी संस्थेने पोलीस कर्मचाऱ्यांना थंड, गरम व कोमट पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन जिल्हा पोलिस दलाला वस्तू स्वरूपात देणगी दिली आहे. या मशीनचे वाटप आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यात १५ पैकी १ मशीन पोलीस अधीक्षक कार्यालयात, १ पोलीस मुख्यालय, तसेच १३ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक मशीन उपलब्ध करून दिली आहे. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार गरम, थंड अथवा कोमट पाण्यासाठी या मशीनचा वापर करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ही पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले. तसेच १५ मशीन दिल्या बद्दल सेवा भावी संस्थेचे आभार मानले.

You cannot copy content of this page