घुमडे येथे श्रावणमास निमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा

⚡मालवण ता.२३-: घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिर येथे घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांच्या वतीने श्रावणमास निमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा दि. १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता भजने सादर होणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ११,१११/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, रु. ७,७७७/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, रु. ५५५५/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ प्रथम – रु. ३,३३३/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, उत्तेजनार्थ द्वितीय- रु. २,२२२/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, उत्तेजनार्थ तृतीय- रु. १,१११/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट गायक, मृदंगमणी, झांजवादक, कोरस अशी प्रत्येकी १,१११ रुपयेची वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर ज्या मंडळांचा प्रथम सहा विजेत्यांमध्ये क्रमांक येणार नाही त्या भजन मंडळातील सर्वोत्कृष्ट गायक, मृदंगमणी, झांजवादक, कोरस यांनाही कै. भूषण देसाई, पाट यांच्या स्मरणार्थ प्रोत्साहनपर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्या भजन मंडळांचा आयोजक व परीक्षक यांच्यावर विश्वास असेल त्याच भजन मंडळांनी ३० जुलै पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी भाऊ सामंत – ९४२३८०६२९८, बाळा माने -७५०७५२२०१००, योगेश सामंत – ९०४९४८८७३२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले आहे

You cannot copy content of this page