अर्चना घारे परब यांनी काढले गौरोउद्गार
⚡बांदा ता.२३-: गावाच्या ज्ञान विकासात वाचनालयांचे योगदान हे महत्वपूर्ण असते. येथील शतक रौप्यमहोत्सव वर्ष साजरा करत आलेले नट वाचनालय विद्यार्थी व वाचनप्रेमी नागरिक यांची नावीन्यपूर्ण उपक्रमातून साहित्याची भूख भागवत आहे हे कौतुकास्पद आहे. असे गौरवोदगार अर्चना फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे काढले. यावेळी वाचनालयाच्या विस्तारित सभागृहासाठी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून १० लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन सौ. घारे-परब यांनी दिले.
माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नट वाचनालयाला करियर गाईन्डन्स च्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात घारे परब बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वाचनालायचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक सौ दर्शना बाबर-देसाई, प्रशांत गवस, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.
