पीक विमा नुकसानीसाठी आंदोलन छेडणार

४५ दिवस झाले तरी रक्कम मिळालेली नाही;आंबा, काजू बागायतदार यांचा इशारा

वेंगुर्ला प्रतिनिधी- पीक विम्याचा जोखीम तारीखचा कालावधीत संपून सुद्धा जवळजवळ ४५ दिवस उलटले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत शेतक-यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक होते. परंतु, अद्यापपर्यंत मिळालेली नाही. यापूर्वी दोनवेळा निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याने १० ऑगस्टपूर्वी नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतक-यांच्यावतीने तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे आंबा व काजू बागायतदार शेतक-यांनी वेंगुर्ला तालुका कृषि अधिकारी यांना दिला आहे.

  या निवेदनावर देवदत्त पवार, प्रदिप सावंत, यशवंत सावंत, शामसुंदर राय, विठ्ठल आरोलकर, उत्तम नाईक, विश्राम सावंत, जयवंत सावंत, प्रविण नाईक, सुभाष भगत, दिगंबर शेटकर, राजन आरोस्कर, रामचंद्र परब, कृष्ण राय, परशुराम मांजरेकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.
You cannot copy content of this page