⚡कणकवली ता.२३-: भूतकाळाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून पुरातनतत्त्व शाखेकडे पाहिली जाते.१९व्या शतकातच पुरातत्त्वीय संशोधनाला मोठी चालना देणारा ‘त्रियुग सिंद्धांत’ महत्त्वाचा मानला जातो लोहयुग, कांस्ययुग आणि तांब्रयुग या तिन्ही युगाच्या पाऊलखुणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतात.हा ऐतिहासिक वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे त्यामुळे संशोधनास पुरेपूर वाव आहे असे प्रतिपादन ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पे’ या विषयावर बोलताना सतीश लळीत यांनी केले.
कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान विभागाच्यावतीने ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पे ‘ या विषयावर व्याख्यान व सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.या कार्यकर्माच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले होते.तर मंचावर डॉ. राजेश साळुंखे ,इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम,भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. बी.एल. राठोड उपस्थित होते.
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पे’ या विषयावर पुढे बोलताना ते म्हणाले की,सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ ठिकाणी कातळशिल्पे आहेत.त्यात कुडापी येथे ६० कातळशिल्पे आहेत. सर्वात जास्त कातळशिल्पे मालवण व देवगड येथे आहेत.मालवण तालुक्यातील हिवाळे येथे प्रथम कातळशिल्पांचा शोध लागला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्पे याविषयावर संशोधन करण्यास विपुल संधी आहे असेही ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्गातील विविध तालुक्यातील कातळशिल्पांचा शोध घेऊन त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा जगासमोर आणण्यासाठी आपण कटिबंद असले पाहिजे असे मत सतीश लळीत यांनी या प्रसंगी मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी विद्यार्थ्यांना इतिहास या विषयाचे महत्त्व सांगितले व 'युवापिढीने हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे' असे मत व्यक्त केले.सर्व प्रथम डॉ. सोमनाथ कदम यांनी प्रास्तविक केले. वक्त्याचा परिचय प्रा.विनया रासम यानी केले.सूत्र संचलन डॉ.मारोती चव्हान यांनी व आभार प्रदर्शन डॉ. तेजस जयकर यांनी केले.यावेळी कार्यक्रमास प्रा. सीमा हडकर, प्रा.सत्यवान राणे, प्रा. एस. आर. जाधव, डॉ. भिकाजी कांबळे, प्रा. सचिन दर्पे, कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.
