⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय अंतर्गत ओरोस या ठिकाणी बाह्यस्रोत तंत्रज्ञ कर्मचारी या पदावर विराज दामोदर गावडे (रा. तिरवडे) यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
याबाबत विज वितरणच्या ठेकेदार कंपनी मार्फत प्राप्त झालेले पत्र विराज गावडे यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, रवी मालवणकर, मोहन कुबल, विजय निकम आदी उपस्थित होते.
