स्वच्छता पुरस्कारासाठी होणार मूल्यमापन
⚡सावंतवाडी ता.२१-: स्वच्छता अभियानात सावंतवाडी नगरपालिकेला ओडीएफ++ मानांकन प्राप्त झाले असून, त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात मूल्यांकनाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.केंद्र सरकार कडून हे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेला प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
लवकरच आणखी एक पुरस्कार सावंतवाडी नगरपालिकेला मिळणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
