देवगड
तालुक्यातील खुडी गावची सुकन्या पूजा विलास जोईल हिची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदी निवड झाली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देवगड तालुक्यातील खुडी गावच्या सुकन्या पूजा जोईल हिचे १० वी पर्यंतचे शिक्षण माध्यमिक विद्यामंदिर खुडी येथे झाले असून पुढील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दोन वर्षे मुंबई येथे झाली.पोलीस सेवेत जावे ही त्यांची पहिल्या पासून प्रामाणिक इच्छा होती.व त्यादृष्टीने तिने मेहनत घेतली.
व तिची २०१९ च्या मुंबई पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झाली.परंतु कोरोना संक्रमण दोन वर्षे काळ वाया गेला .त्या कालावधीत त्यांनी पदवी पर्यतचे शिक्षण बाहेरून पूर्ण केले.व सद्यस्थितीत त्याचे मुंबई येथे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
आजच्या युगात शासकीय नोकरी मिळणे दुरापास्त झाली असून आजच्या महाविद्यालयीन युवक युवतींनी शासकीय सेवेत येण्यासाठी विविध प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा यामध्ये सहभाग घ्यावा.व शासकीय सेवेत यावे.असे आवाहन त्यांनी या निमित्ताने बोलताना केले आहे.तालुक्यातील खुडी या गावी पूजा हिचे कुंटूबिय राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खुडी कन्या पूजा जोईल हीची मुंबई पोलीस दलात निवड
