कणकवली बाळ गोपाळ हनुमान मित्र मंडळातर्फे कष्टकरी महिलांचा सन्मान

⚡कणकवली ता.२१-: कणकवली शहरातील कांबळे गल्लीतील बाळ गोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.या मंडळाच्या माध्यमातुन अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कांबळे गल्ली मधील व्यक्तीचा सन्मान उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी उपपोलीस निरीक्षक बापू खरात, वैभव मालंडकर, शंशाक बोर्डवेकर,वैभवी पाटकर, मंगल पाटकर, संपदा मालंडकर, तेजस गळवी, मनोरमा वालावकर,दिशा मालंडकर, रेश्मा वालावकर, बाळू वालावलकर, संजय मालंडकर, गणपत मालंडकर, विवेकानंद पाटकर, अनिल अणावकर, बंटी पाटकर, प्रियांका मालंडकर,अनिल कांदळकर, दिलीप मालंडकर, रमेश गळवी, राजेश कांदळकर, सूरज सुतार, यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने बाळा गोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे कांबळे गल्लीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी बापू खरात यांना पदोन्नती मिळल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. कष्टकरी महिला व त्यांच्या मुलांनी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना झाडे वाटप करण्यात आले. मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी रांगोळी काढणाऱ्या व्यक्तींचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाला बापू खरात
यांनी आर्थिक मदत दिली.

You cannot copy content of this page