महेंद्र सांगेलकर यांच्या इशाऱ्याने नगरपालिका प्रशासनाला आली जाग

शहरातील चिखल, कचऱ्याची केली सफाई

सावंतवाडी ता.२१-: शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. ते आखरे नगरपालिकेने साफ करून ते परिसर स्वच्छ केले.याबाबत सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर प्रशासन दखल घेऊन ते परिसर साफ केले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक वृत्त अस की शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचा चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत काँग्रेसने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने कर्मचाऱ्यांकरवी हा कचरा हटविला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page