कबुलायतदार जमीन प्रश्नी केसरकर यांनी पुन्हा फसवू नये

यापूर्वीही प्रश्न सुटल्याचे जाहीर केले होते;वसंत गावडे यांची टीका

आंबोली,ता.१६: आमदार दीपक केसरकर यांनी जमिनीचा प्रश्न याआधी देखील सुटला म्हणून सांगितले होते तसे आता देखील पुन्हा प्रश्न सुटला असे सांगून लोकांची दिशाभूल करू नये.असे येथील गावकर वसंत गावडे यांनी सांगितले आहे. श्री.केसरकर यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न सोडवला असल्याचे सांगितले.

याबाबत आज प्रसिध्दी पत्रक येथील गावकर वसंत गावडे यांनी दिले आहे,त्यात म्हटले आहे,आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही.मात्र कित्येक वेळा हा प्रश्न सोडविणार असे पत्रकार परिषदेत गेली १२ वर्षे सांगत असून आपल्याला पालकमंत्री होऊन सुध्दा जमलेले नाही.हा प्रश्न कॅबिनेट बैठकीतच सुटणार आहे.त्यासाठी आधीचा निर्णय रद्द करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी कॅबिनेट घेतली तर त्यातील निर्णय हे कोणते आमदार आणि प्रवक्ते यांना बाहेर सांगता येत नाही.

गोपनीयता असते.सद्या दोनच मंत्री असताना केसरकर हा प्रश्न सोडवला म्हणून जाहीर कसे करतात.मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे.हा राज्यातील वेगळा प्रश्न आहे. मुळात कबुलयातदर ची जमीन ही साधारण ४००० हेक्टर पेक्षा जास्त आहे.त्यात वनसंज्ञा खाली जास्त जमीन आहे,पुन्हा २०१६ मध्ये देखील पालकमंत्री असताना १६०० एकर जमीन वन संज्ञा साठी गेली आणि गेल्या महिन्यात आंबोली मधील जागा राखीव वने म्हणून घोषित झाली.

कबुलयातदर म्हणून फक्त ११०० एकर जागा शिल्लक राहिली.त्यात घरे,संसार,सगळ आहे असे असताना कोणती जमीन नावावर करणार आणि वाटणार,काय शिल्लक आहे, त्यामुळे केसरकर यांनी दिशाभूल करू नये ,ग्रामस्थ नव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सविस्तर याबाबत माहिती देणार आहेत, त्यामुळे केसरकर यांनी दिशाभूल करू नये असे त्यात म्हटले आहे.तसेच आतापर्यंत आंबोलीत दिलेली आश्वासने किती पूर्ण केली याचे उत्तर द्यावे.आंबोलीत केसरकर हे प्रकल्प स्वतः साठी की स्वतः च्या जागेत त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेणार की फक्त गृहीत धरणार, असे म्हटले आहे.

You cannot copy content of this page