पाठ टाचणाची शिक्षकांना सक्ती केली जावू नये

शिक्षक भारतीची माध्य. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी

⚡कणकवली ता.१८-: राज्यात तसेच जिल्हयात ज्ञानरचनावाद ॶॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पद्धतीचे शाळा-शाळांमध्ये अध्यापन सुरू आहे. एकच अध्यापन पद्धत विद्यार्थ्यासाठी लागू पडत नसून विद्यार्थ्याच्या आकलनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित व्हावेत यासाठी शिक्षकांकडून विनाकारण कोणत्याही दैनिक पाठ टाचणासारख्या कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ नये, असे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.
प्रत्येक मूल वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असते व त्यापद्धतीने शिक्षकांना अध्यापन करावे लागत असून त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढावे लागणारे दैनिक, मासिक व वार्षिक नियोजनाचे टाचण कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने याबाबतीत २२ जून २०१५ रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय निर्गमित केला व त्यामध्ये अशा प्रकारच्या कागदपत्रांची शिक्षकांकडून मागणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीसुद्धा जिल्यातील अनेक मुख्याध्यापक शिक्षकांना दैनंदिन पाठटाचण काढण्यासाठी सक्ती करत आहेत अश्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दैनंदिन पाठटाचण काढणेसाठी सक्ती करू नये अशा सूचना आपले • स्तरावरून निर्गमित करण्यात याव्यात अशी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page