आंबोलीत पर्यटक तरुणाचा रस्त्यावर नागीण डान्स

ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न : पोलिस येताच पर्यटक गायब

⚡आंबोली, ता.१५-: रस्त्यावरील ट्रक समोर हॉर्न वाजवून नागीण डान्स आणि धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाला.त्याचीच कॉपी करण्याचा आणि तसा व्हिडिओ काढण्यासाठी ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न आंबोली जकात वाडी येथे पर्यटक तरुण करत होते.

याबाबत आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई याना कळ वल्यानंतर तातडीने ते पेट्रोलिंग साठी आले मात्र तो पर्यंत ते गूल झाले.त्यामुळे अशा प्रकारे धिंगाणा घालणारे किंवा टोळके आंबोलीत पर्यटनाचे वातावरण खराब करत असून यामुळे कुटुंब वत्सल पर्यटक कमी होत असल्याने अशा तरूण युवकांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page