अल्पवयीन मुलीची छेडछाड युवकाच्या अंगलट

बांदा नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या केले स्वाधीन

⚡बांदा ता.१५-: बांदा प्रशालेतील एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणार्‍या सातार्डा येथील युवकाला बांद्यातील नागरिकांनी यथेच्छ प्रसाद देत पोलीसांच्या स्वाधीन केले.

सदर युवक गेले काही आठवडे प्रशालेच्या गेटवर येऊन मुलींची छेड काढत होता. सदर मुलींनी आपल्या नातेवाइकांना याबाबतची माहिती दिली. बांदा सरपंच अक्रम खान यांना या प्रकाराबाबत कल्पना दिल्यानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सदर युवक प्रशालेच्या गेटवर आल्यानंतर सापळा रचत त्याला यथेच्छ प्रसाद देत बांदा पोलीसांच्या ताब्यात दिले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सदर युवकाच्या आईवडिलांसमवेत त्या युवकाची समजूत काढून त्याला सोडून दिले. शाळा, कॉलेजच्या ठिकाणी परिसरातील युवकांचा वावर वाढल्याच्या बर्‍याच तक्रारी आहेत. सदर युवक शाळकरी व कॉलेज युवतींची छेड काढत असतात. बस स्थानकावरही हे प्रकार सर्रासपणे निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी शाळकरी मुली व युवतींनी बांदा पोलीस अथवा बांदा ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page