कनेडी शिक्षण संस्थेची प्रगती कौतुकास्पद

खास.विनायक राऊत;कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचा ६८वा वर्धापनदिन साजरा

⚡कणकवली ता.१०-:
कोकणातील शिक्षण संस्थांनी आपली गुणवत्ता निश्चितपणे प्रगतीपथावर नेलेली आहे. दहावी बारावीच्या निकालातून ही गुणवत्ता राज्यात पहील्या क्रमांकावर आहे. कनेडी शिक्षण संस्थेने आपल्या ६८ वर्षात प्रगतीचा आलेख कमालीचा वाढवला आहे. ही संस्था उत्तरोत्तर प्रगतीवर जाईल या शंका नाही या संस्थेला २५ लाख रुपये आपण खासदार फंडातून निश्चित मदत करू असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिले. ते कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वर्धापन दिन आणि विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रमास मार्गदर्शन करताना बोलत होते.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६८वा वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, अत्याधुनिक व्यायामशाळा उद्घाटन, डिजीटल क्लासरूम्स उद्घाटन खास. विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सतीश सावंत,उपाध्यक्ष पी.डी. सावंत, संचालक डॅा.प्रदिप सावंत, सुधीर सावंत, शिवाजी सावंत, खजीनदार गणपत सावंत, मुख्याद्यापक सुमंत दळवी आदी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर अत्याधुनिक व्यायामशाळा, डिजीटल क्लासरूम्सचे उद्घाटन झाले.

तरच दहावी,बारावीमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या प्रशालेतील ३ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सेल्स टॅक्स अधिकारी दिनेश अमृत सावंत, डॉ. श्रीराम प्रदीप सावंत व डॉ. श्रीकांत प्रदीप सावंत, भारतिय सेवादलातील माजी विद्यार्थी राजाराम भाऊ सावंत, वैद्यकिय पदवी प्राप्त माजी विद्यार्थिनी डॉ. डायना पास्कू डिसोझा, मंडळाचे राधा तुकाराम रासम, सिंधुदुर्ग पोलीस ए.एस्. आय्. संजय साटम या मान्यवरांचा सत्कार खास. विनायक राऊत यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना खास राऊत म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पणं जे बनाल ते सर्वोत्तम बना. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला लाभलेल्या उत्कृष्ट अध्यापकांकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. सतीश सावंत यांनी संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीत सर्वाचा वाटा आहे. यापुढे या शाळेती मुलांसाठी अटल लॅबच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण दिले जाईल. स्पर्धात्मक शिक्षण, उद्योजगता करिअर सोबत प्रवेश परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाला भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, खलांतर – गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच बाळा सावंत, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन आनंद ठाकूर, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रभाकर सावंत, सुत्रसंचालन प्रसाद मसुरकर आणि पल्लवी हाटले तर आभार सहा. शिक्षिका ऋतुजा मेणकुदळे यांनी मानले.

You cannot copy content of this page