आंबोली गावठण येथील टोल वसुली साठीची बेकायदा लाट तत्काळ हटवा…

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव यांची मागणी

⚡आंबोली, ता.१०-: येथील ग्रामपंचायतीने बेकायदा लाट अर्ध्या रस्त्यात घालून कर वसुली करण्यात येत आहे.याकडे तात्काळ शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी गावठण वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव यांनी केली आहे.

आंबोली ग्रामपंचायतीने हिरण्यकेशी आणि राघवेश्वर येथील रस्त्यावर कर वसुली सुरुवात केली आहे.मात्र गावठण शाळेजवळ बेकायदा कोणतीही शासनाची परवानगी न घेता लाट घालून गाड्या अडवल्या जात आहेत.याचा त्रास येथील लोकांना आणि शाळेच्या मुलांना होत आहे.त्यामुळे येथील लाट तत्काळ हटवावी तसेच टोलवसुली ही पॉइंट वर करावी..हिरण्यकेशी रस्त्यात खड्डे असून साईड पट्टी नाही.झाडी मारलेली नाही.वाहनचालकांना त्रास होतो आणि रस्त्यात कसली टोल वसुली असा सवाल श्री.गुरव यांनी केला आहे.ग्रामपंचायत या कडे लोकांनी तक्रार करून लक्ष देत नसल्याने लोकांचा विरोध आहे.शासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी श्री गुरव यांनी केली आहे.

You cannot copy content of this page