खासदार विनायक राऊत; शिवसेनेची चिंता सोडून स्वतःची दुकान किती दिवस चालणार ते पाहावे…
⚡सावंतवाडी ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक निष्क्रिय मंत्री असून, येत्या काही दिवसात त्यांचे मंत्री पद जाणार आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत लक्ष घालण्यापेक्षा स्वतः चे दुकान किती दिवस सुरू राहणार आहे ते बघावे असा जोरदार टोला खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.
यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, राणेंनी शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा आपल्या मुलांची चिंता करावी असा सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, राणेना आता आपला मुलगा पालकमंत्री झाल्याची सप्न पडत असून, केसरकरांच्या रूपाने पालकमंत्री दिसतील असा टोला देखील लगावला आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, या बंडखोर आमदारांना आता शिवसेनेची दार कायमची बंद झाली असून, ती पुन्हा कधीच उघडणार नाहीत. असा इशारा दिला आहे.
यावेळी संजय पडते, सतिश सावंत रूपेश राऊळ,विक्रांत सावंत,संदेश पारकर जानवी सावंत अप्पा परडाकर आदी उपस्थित होते.
