पहाटे चार वाजता “ऑन ड्युटी” कामगिरी
⚡कणकवली ता.०९-:
कणकवली शहरात गांगो मंदिर जवळ एचडीएफसी बँके जवळअसलेले झाड शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने एका बाजूचा सर्विस रोड पूर्णतः बंद झाला होता. याबाबतची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने नगरपंचायतचे पथक घटनास्थळी पाठवले.
झाड पडल्याने या ठिकाणी असलेल्या जाधव मेस्त्री यांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज झाडाखाली दबले गेले. नगरपंचायतच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने हे झाड हटवत सर्विस रोड वाहतुकीस सुरळीत केला. सुमारे तासभर हे काम सुरू होते. यावेळी नगरपंचायत कर्मचारी व नगरपंचायत चे कचरा ठेकेदार मिथुन ठाणेकर उपस्थित होते
