ब्राह्मण मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला ब्राह्मण मंडळाच्या ३ जुलै रोजी कुबलवाडा दत्तमंदिरात झालेल्या सभेत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यामध्ये १३ जुलै रोजी व्यासपौर्णिमेनिमित्त सायं. ४ वा. कुबलवाडा दत्तमंदिरात व्यासपूजन, दि.२३ जुलै रोजी श्री रामेश्वर मंदिरात प्रतिवार्षिक महारुद्र आणि २४ जुलै रोजी तालुका ब्राह्मण मंडळाचा वर्धापनदिन व गुणगौरव समारंभ कुबलवाडा दत्तमंदिरात दु. ३ ते ५ या वेळेत होणार आहे. यात तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवत्ता प्राप्त, पदवी परीक्षा, बीएएमएस व बीएचएमएसमधील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची प्रत किरात कार्यालय, वेंगुर्ला येथे २० जुलैपर्यंत आणून द्यावीत असे आवाहन अध्यक्ष श्रीकांत रानडे व सचिव नित्यानंद आठलेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page