मराठा समाजबांधवांनी पुढाकार घेऊन करिअर मार्गदर्शन केंद्र सुरु करावेकिशोर गवस

कणकवली येथे मराठा समाज विद्यार्थ्यांचा गौरव व शिक्षकांचा सत्कार

⚡कणकवली ता.०३-: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे . विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व मार्गदर्शन मिळावे याकरिता समाजबांधवांनी पुढाकार घेऊन करिअर मार्गदर्शन केंद्र सुरु करावे , अशी अपेक्षा कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी व्यक्त केली.

मराठा समाज प्राथमिक शिक्षक व सकल मराठा समाज कणकवलीतर्फे समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजातील शिक्षकांचा सत्कार येथील मराठा मंडळाच्या सभागृहात आयोजित केला होता . या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी सुहास पाताडे , बच्चू प्रभुगावकर , सुशील सावंत , सोनू सावंत , ए.डी.राणे , शैलेश सावंत, भाई परब , सुशांत दळवी,सुहास सावंत , तन्वी भावे, नीलम सावंत, आदिती मालपेकर ,शिक्षक अमोल भंडारी ,सुशांत मर्गज , शैली सावंत , श्याम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी मराठा समाजातील 150 विद्यार्थी व10 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी किशोर गवस म्हणाले , दहावी व बारावीच्या प्रवेशासाठी जी कागदपत्रे लागतात ती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी समाजबांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कॉम्प लावणे नितांत गरजेचे पालकांनी आपल्या पाल्याचा कोणत्या क्षेत्राकडे कल आहे हे जाणून घेत त्यांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रोत्सहान दिले पाहिजे . आपल्या पाल्यात असलेले कलागुण पालकांनी ओळखून त्या कलागुण अधिक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले पाहिजेत ,
यश आले म्हणून हुरळून जावू नका आणि अपयश आले म्हणून खचू नका , असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला दहावी व बारावीच्या परीक्षेत तुम्ही मिळवेल्या यशाचा समाजाला अभिमान असून भविष्यात समाजातील मान उंचावेल अशी कामगिरी आपण करावी अशी अपेक्षा मराठा समाजाचे सुशिल सावंत यांनी व्यक्त केली.

अमोल भंडारी यांनी दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना कोण कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे . याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले . स्पर्धा परीक्षांना समोरे जाण्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी . वेळेचे नियोजन अभ्यास कशाप्रकारे करावे याबाबत देखील मार्गदर्शन करून कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची तयारी, इच्छाशक्ती , आत्मविश्वास महत्वाचा असून यशवंत होण्याचा हाच पासवर्ड असल्याचे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले . मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गौरव व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा समाजबांधवांनी अभिवादन केले . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम सावंत यांनी केले . यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित समाजबांधव उपस्थित होते .

You cannot copy content of this page