डीगस चोरगेवाडी तलावात बेकायदा वॉटर स्पोर्ट्स सुरू

प्रशासनाचे दुर्लक्ष:मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप

⚡कुडाळ ता.०३-: जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण नियमावली लागू झालेली असताना कुडाळ तालुक्यातील डिगस चोरगेवाडी तलावात बेकायदा नौका विहार, स्कुबा ड्रायव्हिंग,बनाना राईड आदी धोकादायक जल पर्यटनाचे खेळ पावसाळी हंगामात कशे काय सुरू आहेत असा सवाल कुडाळ मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी नसताना सदरचे प्रकार खुलेआम सुरू असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व तलाव परिसराच्या स्वच्छतेबाबत कोणतेही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पर्यटन जिल्ह्यात अशा पर्यटन उपक्रमांचे स्वागतच मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मालवण बोट दुर्घटनेसारखा एखादा प्रकार घडून जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण हा खरा सवाल असून, दुर्घटनेनंतर जिल्ह्याची पर्यटनाच्या दृष्टीने होणारी बदनामी पर्यटन जिल्ह्याला भूषणावह ठरणारी नाही.स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनाई केल्यानंतर देखील सदरचे प्रकार नेमके कोणाच्या पाठिंब्याने खुलेआम सुरू आहेत हे उघड होणे गरजेचे आहे असे गावडे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हणाले

तसेच पाटबंधारे विभाग कोणतीही ठोस कारवाई न करता फक्त संबंधित व्यावसायिकांना नोटीसा देऊन व तहसीलदार, पोलीस प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतंय का असा सवाल गावडे यांनी उपस्थितीत केला असून .कोणाचा जीव गेल्यानंतरच जिल्हा प्रशासनाला जागं येणार असेल तर हे दुर्दैव असून झोपलेल्या प्रशासनाला मनसेलाच आता जागं करावं लागेल असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page