वेंगुर्ला प्रतिनिधी- शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ला येथे पावसाचे औचित्य साधून ‘मान्सून मेनिया‘ उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुलांनी ढग, मासे, वीज, बेडुक, अळंबी, इंद्रधन्युष्य, ऑक्टोपस यासारख्या विविध वेशभूषा परिधान करुन आपले कलागुण सादर केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
