माजी विद्यार्थ्यांची “ते” दातृत्व कौतुकास पात्र

विलवडे ग्रामोन्नती मुंबई अध्यक्ष संभाजी दळवी यांचे गौरौउद्गार

⚡बांदा ता.०३-: विद्यार्थ्यांच्या सोईसाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वाहन भेट दिल्याने हे माजी विद्यार्थी काैतुकास पात्र आहेत. पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबियांतील विद्यार्थांना या वाहनाने वेळेत प्रवास करणे सोयीचे होणार आहे. शाळेच्या विकासासाठी आम्ही पावले उचलेली आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळत आहे. असे गौरवोदगार विलवडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष संभाजी दळवी यांनी येथे काढले.
राजा शिवाजी विद्यालय, विलवडे हायस्कूलमध्ये ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ आयोजित ‘वाहन लोकार्पण सोहळा’ उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच व मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन संस्था अध्यक्ष संभाजी दळवी व सचिव सुर्यकांत दळवी यांच्या हस्ते सपन्न झाला.
विलवडे बरोबरच वाफोली, सरमळे नांगरतास, भालावत, कोनशी, तांबोळी या पंचक्रोशीतून दूरवरून येणारे विद्यार्थी आणि त्यांची येण्या जाण्यासाठी करावयाची लागणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नवीन चार चाकी वाहन खरेदी केले आणि शाळेला भेट दिली. यात सर्वाधिक योगदान दिले ते जया दळवी, संदीप दळवी, गिरीश दळवी यांनी कै. पांडुरंग शिवराम दळवी यांच्या स्मरणार्थ या वाहन खरेदीसाठी सर्वाधिक दोन लाखाचा निधी स्वतःत्यांनी आपल्या परिवाराकडून दिला.
यावेळी विलवडे सरपंच रावजी दळवी, जेष्ठ शिक्षकतज्ञ राजाराम दळवी, तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, माजी उपसभापती कृष्णा सावंत, विनायक दळवी, विलवडे पतसंस्था अध्यक्ष विलास गावडे, बांदा केद्रशाळेच्या जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक, भालावल माजी सरपंच रमेश परब, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहिदास दळवी, उपाध्यक्ष समीर गावडे, सचिव रुपेश परब, खजिनदार जयश्री दळवी, सरमळे मुख्याध्यापक शरद गाबित, भालावल मुख्याध्यापक श्री कोठावळे, जेष्ठ शिक्षिका कल्याणी नाईक, जनार्दन गावडे, परेश धर्णे, गोपाळ दळवी, आनंद दळवी, देऊ दळवी, आजी-माजी विद्यार्थी सह ग्रामस्थ, शिक्षक वृंद, पालकवर्ग सह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, स्वागत करून आभार मुख्याध्यापक एन. एल. सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page