राष्ट्रवादीने शिकविलेले वाया गेले नाही;माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत फ्टकेबाजी
⚡मुंबई दि.०३-: दीपक केसरकर तर आता काय चांगले प्रवक्ते झालेत. त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलं नाही, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर माजी उपमुख्यंत्री अजित पवरा यांनी अध्यक्षांचे आभार मानत सभागृहात तुफान फटकेबाजी केली.
