बांदा तेरेखोल नदीतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ

तलाठी, ग्राम पंचायत सदस्यांनी केली पाहणी

बांदा /प्रतिनिधी
गेले २ दिवस बांदा तेरेखोल नदीच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. बांदा शहराला नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका असल्याने आज बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी व बांदा ग्रामपंचाय सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, राकेश केसरकर यांनी पाहणी केली. गेले आठ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी किती वाढली याची पाहणी करण्यात आली. गतवर्षी बांदा शहरात पुराच्या पाण्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बांदा वासियांनी काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page