विलवडे हायस्कूलच्या मुलांसाठी देणार वाहन

उद्या लोकार्पण;माजी विद्यार्थी संघटनेचे दातृत्च

बांदा/प्रतिनिधी
राजा शिवाजी विद्यालय विलवडे हायस्कूलमध्ये येणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्याना वेळेत जाणे येणे सोयिस्कर होण्यासाठी हायस्कूलसाठी वाहन सुफुर्त करण्यात येणार आहे. अशी माहिती ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ च्यावतीने देण्यात आली आहे. विलवडे हायस्कूलमध्ये ‘वाहन लोकार्पण सोहळा’ रविवार दिनांक ३ रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार आहे.
या हायस्कूलने गेल्या ३५ वर्षात विलवडे पंचक्रोशीतील विलवडे वाफोली,तांबोळी, कोनशी,भालावल,असनिये, सरमळे या गावातील हजारो विद्यार्थी घडविले आहेत. कोरोना काळात या विद्यार्थ्यांना वेळेत येणे जाणे शक्य होत नव्हते. प्रवासी वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना या हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची आपल्या दुचाकीने येण्याजाण्याची सोय केली होती.
त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन या हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या जाणे-येणे प्रवास सोयीसाठी वाहन खरेदी करण्याचा निर्धार करून सर्वांच्या सहकार्याने वाहन खरेदी केले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी या वाहनाचे व्यवस्थापन विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) आणि राजा शिवाजी विद्यालय,विलवडे यांच्यावतीने करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विलवडे हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहिदास दळवी, उपाध्यक्ष समीर गावडे, सचिव रुपेश परब, सहसचिव सत्यवान राणे-कोनसकर, खजिनदार सौ जयश्री दळवी – सुपल, सहखजिनदार सौ कृष्णकला दळवी – नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page