⚡बांदा ता.०२-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम प्रशालेत कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाडलोस कृषि तंत्र विद्यालयाच्या सहशिक्षिका शालन गवस यांनी विद्यार्थ्यांना कृषि दिन व जीवनात झाडांचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
