जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावे

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक : पाडलोस प्राथमिक शाळा नं.2 मध्ये वह्या वाटप

⚡बांदा ता.०२-: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या टिकवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. इंग्रजी माध्यमाची मुले मराठी शाळांत वळतात. प्रशासनाकडून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली

जातात परंतु गणवेश वाटप करताना जिआरमध्ये बसणाऱ्याच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी असल्याने प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश वाटप करावा अशी मागणी, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 पाडलोस मध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप प्रसंगी श्री. नाईक बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस सिंधु दुग्ध संस्था चेअरमन अर्जुन कुबल, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब तसेच शिक्षक गोविंद शेर्लेकर, ग्रामस्थ समीर नाईक, अमोल नाईक, संजय नाईक, विलासिनी नाईक, भास्कर नाईक आदी उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व वह्या पुरविणार असून ग्रामस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्य साध्य करण्याचा मानस श्री. नाईक यांनी व्यक्त केला. पाडलोस केणीवाडा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना विश्वनाथ नाईक यांच्यातर्फे वह्या वाटप करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी केले तर आभार शिक्षक गोविंद शेर्लेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page